-->

About

आपल्या सेवेत www.tribalmahavikas.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देऊन आपल्या समाजातील माहिती, विविध रोजगार नोकरी संधींचे संकलित सेवा प्रदान करत आहोत. सदरील संकेतस्थळ हे आपणास नवीन नोकरीच्या अद्ययावत जाहिराती, तसेच उपलब्ध होणारे प्रवेशपत्र, नुकतेच जाहीर झालेले निकाल तात्काळ उपलब्ध करून देत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत असताना जास्तीत जास्त नोकरीचे अर्ज ऑनलाईन भरावे लागतात व भरपूर नोकरीविषयक जाहिराती संबंधित संकेतस्थळावर प्रकाशित होतात.

आमचे संकेतस्थळ आपणास नोकरीविषयक जाहिरातींची माहिती पुरवीत असताना त्या जाहिरातीच्या हेडिंग वर क्लिक केल्यावर सदरील संकेतस्थळाच्या Apply / Website लिंक वर घेऊन जाईल व उमेदवारांचा वेळ व होणारी हेळसांड थांबवेल तसेच उमेदवार स्वतः नोकरीचे अर्ज ऑनलाईन भरू शकतील. तसेच जाहिरातीची PDF उपलब्ध करून देत आहोत. सदरील PDF मध्ये जाहिरातीची सर्व परिपूर्ण माहिती दिलेली असते.

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपणाला अनेक गोष्टींची उपलब्धता संकेतस्थळावर हवी असते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाची महाविद्यालये यांची माहिती google map नकाशाद्वारे लोकेशन पुरवून पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.

शेवटी एवढ सांगू इच्छितो की, सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळविणे हि एक कठीण समस्या आहे परंतू माहिती तंत्रज्ञानाचा व इंटरनेटचा वापर करून होईल तेवढी माहिती अद्ययावत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. उमेदवारांच्या नोकरी मिळविण्याच्या कार्यात तसेच पालकांच्या पाल्याच्या भविष्य निश्तितीच्या कार्यात मदत करून खारीचा वाट मिळविण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.

 


Subscribe Our Newsletter