-->

वीर राघोजी भांगरे

            

            १९ व्या शतकाची सुरुवात झाली. इंग्रजांची सत्ता येणार अशी चिन्हे दिसू लागली. इंग्रजांना संघटित विरोध होऊ लागला. इंग्रजी राजवटीला विरोध करण्यासाठी पुणे, नगर, नाशिक, ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी विभागात महादेव कोळी व भिल्लांच्या संघटना स्थापन झाल्या, कोणत्याही राजवटीशी समरस न झालेल्या महादेव कोळी आणि भिल्ल जमातींनी यापूर्वीच इंग्रजांविरूध्द बंडाचे निशाण उभारले होते. राज्यकर्त्यांविरूध्द जो बंड करतो तो दडपशाहीस तोंड देण्यास तयार असतो.. या न्यायाने महादेव कोळी आणि भिल्ल जमातींच्या लोकांवर अन्याय, जुलूम, जबरदस्ती, कैद, फशी असे अनेक प्रकार झाले, पण त्यांची जिद्द कणभर कमी झाली नाही. इंग्रजांविरूध्द बंडाचा पहिला उठाव जुन्नर भागात झाला. हा.. हा.. म्हणता ही वार्ता कोळवण प्रदेशातील महादेव कोळी जमातीत पसरली. बंडाचे लोण त्या पाठोपाठ अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यात पोहोचले. इ.स.१८३० साली जुन्नरला झालेल्या पहिल्या बंडाचे नेतृत्व भाऊ खरे, चिमणाजी दरबारे व जाधव यांनी केले. आमचे भांडण कंपनी सरकार विरूध्द आहे. जनतेने त्यात सामील व्हावे, असे त्यांनी जाहीर केले. घोडेगाव विभागात (ता.आंबेगाव, जि.पुणे) बिगर आदिवासी लोकांनी क्रांतिकारकांना मदत करण्या ऐवजी कंपनी सरकारला मदत केल्यामुळे या लढ्यात ५४ महादेव कोळी क्रांतिकारकांना व त्यांच्या दोन प्रमुख नेत्यांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर इ.स. १८३८ मध्ये रतनगड किल्ल्याच्या परिसरात क्रांतिकारकांच्या बंडाने व्यापक स्वरूप धारण केले. पण त्यांचेही मार्ग इंग्रजांनी रोखून धरले. त्याला उत्तर म्हणून बंडखोरांनी इंग्रजांचा खजिना आणि तीन गावे लुटली. या झटापटीत राघोजी भांगऱ्याचे ८० लोक कैद करण्यात आले. तरी देखील माघार न घेता राघोजीने चळवळ चालू ठेवली. इंग्रजांशी सामना देण्यास तो तयार झाला. बंडात सामील होऊ नये म्हणून राघोजीला आमिषे दाखविली. परंतु समाजाचा छळ, वचनभंग, बंडखोरांची कत्तल यामुळे ती चिडला. त्याचा पिंड क्रांतिकारकाचा आणि लढवण्याचा वाटत होते. शेवटी त्याने जाहीर लढा पुकारला. ही बातमी हा..हा.. म्हणता सर्व आदिवासी समाजात परसली, शेकडी तरुण त्यांच्या साथीला जमा झाले. ही बातमी इंग्रज अधिकान्यांना समजली. पोलिसांच्या अनेक तुकड्या त्याला पकडण्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्याचा सुगाव लागला नाही. त्यामुळे इंचाज अधिकारी चिडले. त्यांनी राोजीच्या आईचा अमानुष छळ केला. या कृत्याची चीड येऊन सर्व महादेव कोळी जमातीत मोठी खळबळ निर्माण झाली. इंग्रजांना चांगलाच धडा देण्यासाठी राघोजीला मदत म्हणून बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी नवी संघटना तयार केली. राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापू आगरे याचा त्यावेळी- फितुरीने घात झाला. राघोजीला पकडण्यासाठी ५००० रू.चे बक्षीस जाहीर करण्यात आले. पैशाच्या - आमिषाने लोक फितुरी करतील व आपलाही घात होईल या भीतीमुळे वेशांतर करून राघोजी घाट उतरून कोकणात गेला. पण अखेर तेच त्याचे दुर्दैव ठरले. तो साधूच्या वेशात असताना ठाणे जिल्ह्यात त्याला पकडण्यात आले आणि फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. फाशीच्या शिक्षेला तो हुलमणला नही. राघोजीखरा क्रांतिकारक वीर होता. फाशी देण्यापेक्षा मला वीराचे मरण द्या. तलवारीच्या वाराने माझी एक घाव दोन तुकडे करा असे त्याने कंपनी सरकारला फर्मावले. त्याचे हे म्हणणे मान्य झाले नाही. या वीर पुरुषाला अखेर २ मे १८४८ रोजी ठाण्याच्या तुरुंगात फासावर देण्यात आले. त्याच सुमाराला नाशिक, संगमनेर, अकोला भागात देखील महादेव कोळी व मिल्ल आदिवासींनी बंडाचे निशाण उभारले. सरकारी खजिने लुटेव किल्लेदारांना फितूर करणे हे त्यांचे त्यावेळचे प्रमुख कार्य होते. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील आदिवासी क्रांतिकारकांच्या बंडाचे बिग फितुरीमुळे फुटले. त्यामुळे अनेक लोक कैद झाले. कैद्यांचे तुरुंगात अतोनात हाल करण्यात आले. त्यातील १०० लोक तुसंगात अन्नपाण्यावाचून मरण पावले. त्याचवेळी कैदेत असलेल्या बंडखोरांना तुरुंगातच गोळ्या घालून ठार मारण्यात आले. अशी बातमी सर्वत्र पसरली. त्याचा परिणाम पुणे, अहमदनगर भागातील महादेव कोळी आणि मिल्ल आदिवासी जमातीत मोठी खळबळ उडाली. तरुण मंडळी पुन्हा बंडात सामील होऊ लागली. इंग्रजांना कोंडीत धरण्याच्या दृष्टीने योजना आखल्या जाऊ लागल्या. पण सतत फितुरी होत गेली. इंग्रजाला बंडाच्या योजनेचा सुगावा लागला. त्यामुळे बंड यशस्वी होण्याच्या आतच त्याचा बंदोबस्त करण्यात आला. बंडखोर भूमिगत झाले, बंडात सामील होऊ नये म्हणून वीर राघोजी भांगरे यांच्या बंधूला सरकारने सैन्यात बट्या नोकरीवर घेतले.

Post a Comment

Subscribe Our Newsletter