सन १८४७ मध्ये धुळे जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील कुँवर वसावाने बंड पुकारले. नंदुरबारच्या भिल एजंटावर कुँवरसिंग नाराज होता. आपल्या कारभारात भिल एजंट, हस्तक्षेप करतो हे त्याला बिलकूल पसंत नव्हते. ब्रिटिशांनी त्याला शरण आल्यास माफी देण्यात येईल म्हणून सांगितले पण कुँवरसिंग वसावा माफी मागण्यास तयार नव्हता. पुण्याहून घोडेस्वाराचे दल, मालेगावहून भिल पलटणीतले सैनिक आणून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याने ब्रिटिशांशी जोरदार टक्कर दिली. परंतु त्यात कुँवरसिंग वसावा पकडला गेला. त्याला दहा वर्षाची सक्त मजुरीची सजा देण्यात आली. कुँवरसिंग वसावाचा मुलगा रामसिंग व पुतण्या सोनाज ह्यांना ब्रिटिशांनी पुण्याला शिक्षणासाठी पाठविले. पुण्याच्या त्यावेळच्या कॉलेजात त्यांनी प्रथम चांगलीच प्रगती दाखविली. पण त्यानंतर ते दोघे कॉलेजचे प्रमुख प्राध्यापक मेजर कॅन्डीशीच भांडले व कॉलेज सोडून पळून ह्या भागात परत आले. रामसिंगने आपल्या बापाचा कारभार हाती घेतला आणि तो ही गप्प बसले नाही. पुढे ब्रिटिशांनी १८७८ मध्ये रामसिंगालाही पकडले आणि जन्मठेपेची शिक्षा देऊन देशाबाहेर पाठविले.
खाज्या नाईक हा १८३१ ते १८५१ पर्यंत वीस वर्षे ब्रिटिशांच्या नोकरीत होता. उत्तरदक्षिण जोडणाऱ्या, हल्लीच्या मुंबई-आया रोडवरील सेंधवा घाटाच्या भागातून प्रवास करणाया व्यापा-यांना, प्रवाशांना संरक्षण देण्याचे काम तो करत होता. त्यावेळी ह्या मार्गाने मुंबईकडे माल नेला जाई. विदर्भातील कापूस, गांजा, अफू ही द्रव्ये भिवंडी पर्यंत पोचवली जात. तेथून हा माल पुढे युरोपात, चीनला पाठविण्यात येत असे. घनदाट जंगलातून जाणाऱ्या ह्या शेकडो बैलगाड्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस पथकाचा खाज्या नाईक प्रमुख होता. एक पकडलेला लुटारू खाज्या नाईकाच्या हातून मारला गेला. या आरोपाखाली त्याला दहा वर्षाची सजा झाली. दहा वर्षानंतर १८५५ मध्ये त्याची सुटका झाली. खाज्याने आपल्याला परत नोकरीत घ्यावे ही विनंती केली परंतु ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. १८५७ सालो वातावरण तापू लागले होते. ब्रिटिशांना खाज्या नाईकाची आठवण झाली. परिस्थिती पाहून त्याला परत नोकरीत घेण्यास ब्रिटिश तयार झाले. खाज्या नाईकाच्या हे लक्षात आले. तो तयार झाला नाही. मधल्या काळात तो स्वस्थ बसला नव्हता. देशात काय होत आहे याच्या बातम्या त्याला मिळत होत्या. उत्तर भारतात जे काय घडत होते त्यामुळे ब्रिटिश घाबरले आहेत हे त्याच्या लक्षात आले होते. दोन वर्षे वाट पाहायला लावल्यावर आताच ब्रिटिश आपल्याला नोकरी देण्यास का तयार झाले आहेत हे त्याला समजत होते. त्यामुळे दिल्लीहून इशारा मिळताच खाज्या नाईक, भीमा नाईक, मेवाश्या नाईक यांनी बंडाचा झेंडा उभारला. भीमा नाईक, मेवाश्या नाईक व आनंदा यांनी आपल्या सोबतीला ७-८ शे भिल्ल जमवले आणि त्यांनी गाव लुटायला सुरुवात केली. ब्रिटिश सैन्याला लढ्याचे आवाहनच दिले. हणमंतराव हा भिल्ल नाईकही त्यांना येऊन मिळाला. त्यांनी दांतवारा गावावर हल्ला करून हे गाव उध्वस्त केले. काजरसिंग ऊर्फ खाज्या नाईकाने बंडाचे निशाण उभारल्याबरोबर खानदेशातील सगळ्या भागातून मिल येऊन त्याच्या सैन्यात दाखल झाले. त्याने जवळच्या खेड्यामध्ये दहशत निर्माण केली आणि सेंधवा घाट कब्जात घेऊन केली. येणाऱ्या जाणाऱ्या बैलगाड्यांवर कर वसुली करण्यास सुरुवात
याच सुमारास होळकरांच्या राज्यातून मुंबईला जाणारा सरकारी खजिना खाज्या नाईक आणि त्याच्या साथीदारांनी लुटला. खजिन्याचे रक्षण करण्यासाठी तीनशे सैनिक होते सम त्यांनी मिल्लांना विरोध न करता खजिना लुटण्यास मुभा दिली, या लुटीत बंडखोरांना ७ लाख रुपयांचा ऐवज मिळाला, या तुतीने ब्रिटिशांचे धाबेच दणाणले. खानदेश पेटला तर आपली सत्ता टिकवणे अतिशय अवघड होईल हे ब्रिटिशांनी चांगले ओकलले, त्यांनी भराभर वेगवेगळ्या भागातून घोडदळ, पायदळ सैन्य खानदेशामध्ये पाठवायला सुरुवात केली व परिस्थिती भाटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला.
खजिना लुटण्यात आलेल्या यशाने खाज्या नाईकाची ताकद वाढली. ४००-५०० लोक बरोबर घेऊन त्याने पकारनेर लुटले. महादेव नाईक व दौलू नाईक हे आपल्या लोकांसहलाला येऊन मिळाले. खाज्या नाईक भीरघाट किल्ल्याकडे वळला, चोहोकडून भिल्लांच्या टोळ्या येऊन त्याच्या सैन्यात दाखल होत होत्या. अक्राणी महाल भागात ब्रिटिश सत्तेविरूष्ट उभा राहिलेला काळूबाबा, खाज्या नाईकाला येऊन मिळाला होता, होळकरांच्या धार संस्थानच्या सैन्यातील रोहिले, मक्राणी व अरख सैनिकही खाज्या नाईकच्या सैन्यात दाखल होत होते. चोहोकडे मिल ब्रिटीशांविरूध्द उठले होते. सुलतानपूर मधील अशाच निल बंडखोरांनी सारंगखेडा गावावर हल्ला चढविला. मंदाणाच्या रूमाल्या नाईकही स्वस्थ नव्हता. शहादा भागातील भिल्लांच्या वाढत्या हालचाली पाहून सैन्याची एक फलटण तेथे पाठविण्यात आली होती. याच काळात भीमा नाईकही खाज्या नाईकाच्या साथीला आला, खाज्या नाईक व भीमा नाईक यांनी आपल्या १५०० साथीदारांसह ६० अफूच्या गाड्या लुटल्या, पोस्ट ऑफिसही लुटले, भीमा नाईक हे या लढ्यातील अत्यंत गूढ असे व्यक्तिमत्व होते. ब्रिटीशांविरु पद १८५८ पर्यंत सतत दहा वर्षे एकाकी लढत राहिलेल्या त्या कुशल संघकाचे खानदेश, नाशिक, नगर, निफाड भागातील गिलांशी संबंध होते. नाशिक, नगर भागात ब्रिटिशांना तंग करून सोडणाचा मागोजी नाईकानेडी खाज्या नाईकाला येऊन मिळण्याचा प्रयत्न केला. तो निजामाच्या राज्यातून खानदेशक निघाला पण बिरिशसल्याने त्याला वाटेतच अब्बून परतायला लावले, भीमा नाईकाने असे घोषित केले होते, की दिल्लीच्या बादशहाने खानदेश मुक्त करण्याचा त्याला आदेश दिला आहे. आपला लढा हा या देशाला गोऱ्यांपासून स्वतंत्र करण्यासाठी आहे आणि म्हणून ब्रिटिशांच्या पदरी असणाऱ्या या देशाच्या पोलिसांनी, सैनिकांनी बंडखोर भिल्लांना सामील व्हावे असे आवाहन त्याने केले होते,
ब्रिटिशांनी भिल्लांचा उठाव दडपून टाकण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय अंमलात आणले. जिल्ह्यातील सैनिकांची ठाणी वाढविण्यात आली. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या या भागात नेमणुका करण्यात आल्या. त्यांना कडक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले. धरणगांव व मालेगाव येथे भिल्लांच्या नवीन पलटणी उभारण्यात आल्या. एवढेच नाहीतर भिल्लांशी लढण्यासाठी महादेव कोळी आदिवासींच्या पलटणी नगर जिल्ह्यात उभ्या करण्यात आल्या. जागोजागी भिल्लांना वेढून त्यांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न झाले, काजीसिंग आणि त्याच्या साथीदारांना अखेर बड़वानी जवळ गाठण्यात ब्रिटिश सैन्य यशस्वी झाले. मेजर इव्हान्स जेंव्हा बडवानी जवळ पोहोचला तेंव्हा बड़वानीचा कोतवाल त्याला सामोरा गेला, मेजर इव्हान्सने खाज्या नाईक,भीमा नाईक यांच्याबाबत वारंवार विचारूनही कोतवालाने त्याला काही पत्ता लागू दिला नाही. तरी पण ब्रिटिशांना खबर लागली होती की जवळपासच्या जंगलात, अंबापाणीच्या डोंगराच्या आश्रयाने ३००० भिल्ल, मकराणी व रोहिले बंडखोर लपले आहेत. ब्रिटिश सैन्याने ताबडतोब हालचाल केली. आपल्या सुसज्ज सशस्त्रांसह त्यांनी भिल्ल बंडखोरांना चोहोबाजूने वेढले. भिल्ल बंडखोर डोंगरावर चढले. ब्रिटिश सैन्याने त्यांना कोंडीत पकडले होते पण झाडझुडपाच्या दगडाधोंड्याच्या आधाराने त्यांनी ब्रिटिश सैन्याशी लढायला सुरुवात केली. भिल्ल बंडखोरांची संख्या बरीच होती पण त्यांच्याकडे पुरेशा बंदुका नव्हत्या. भरपूर दारूगोळा नव्हता. तरीही बंडखोरांनी मोठ्या शौर्याने, हिंमतीने ब्रिटिश सैन्याशी सामना दिला. ब्रिटिशांचे दोन अधिकारी मारले गेले. १६ सैनिक मारले गेले. कित्येक सैनिक जखमी झाले. त्यात बंडखोरांची फार मोठी हानी झाली. अनेक स्त्री-पुरुष ब्रिटिशांच्या बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडले. दगड-धोंड्यामध्ये, नाल्यांच्या घळ्यामध्ये, गवतावर, डोंगरावर बंडखोरांची प्रेते पडलेली होती. त्यात ब्रिटिशांनी ४६० बंडखोर स्त्रीपुरूषांना कैद केले. यात खाज्या नाईक, मेवाशा नाईक, भाऊ रावळ यांच्या बायका होत्या. भीमा नायकाची पुतणी होती. खाज्या नाईकाचा मुलगा पोलादसिंग मात्र यात मारला गेला. बंडखोराचे प्रचंड नुकसान झाले होते, पण खाज्या नाईक, भीमा नाईक व त्यांचे नुकसान झाले होते, पण खाज्या नाईक, भीमा नाईक व त्यांचे काही साथीदार जिवंत निसटले होते. मकराण्यानी मिलनायकांचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिश सैन्याशी मोठ्या जिद्दीने सामना दिला. पकडलेल्या कैद्यातील ५७ कैद्यांना ब्रिटिश सैनिकांनी तेथल्या तेथे गोळ्या घालून ठार केले. आदिवासी स्त्रियांना अटक करून तुरुगात डाबले.
आपल्या असंख्य साथीदारांचा मृत्यू, आपल्या कुटुंबाची झालेली वाताहत अनुभवूनही खाज्या नाईकाची हिंमत खचली नव्हती. ब्रिटिशांशी सामना देण्याची त्याची तयारी होती आणि तसा तो सतत लढतही राहिला. पण मधल्या काळात देशाची परिस्थिती खूपच बदलली. उत्तर भारतातील बंडाचा बिमोड करण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. तात्या टोपे नर्मदेपर्यंत येऊन परत गेला होता. झाशीची राणी बलिदान झाली होती. तरी पण मिलांचा विरोध मोडून काढण्यात ब्रिटिश यशस्वी झाले नव्हते. खाज्या नाईक मोकळा होता. भीमा नाईक लढत होता, भागोजी नाईक ब्रिटिशांशी टकरत होता.
ब्रिटिशांनी आपल्या कूटनीतीचा डाव टाकला. एकाकी पडलेल्या खाज्या नाईकाला निरोप पाठविला. खाज्या नाईकाने आपल्या सर्व साथीदारांना त्यांच्या गावाला परत पाठवावे व धुळ्याच्या कलेक्टरला शरण यावे. सरकार खाज्या नाईकला ठार मारणार नाही, फाशी देणार नाही, जिवंत ठेवून जन्मठेपेच्या शिक्षेवर पाठवील. देशातील वातावरण बदलले होते, ठिकठिकाणी बंडखोरांचा पराजय झाला होता. स्वातंत्र्य लढ्यातील धुरंधर सेनानी एक तर मरण पावले किंवा भूमिगत झाले होते. जवळपासचे संस्थानिक आता घाबरून गप्प झाले होते. गावातील लोक आता भिल्ल बंडखोरांना साथ देण्यास तयार नव्हते. सातपुड्याच्या सह्याद्रीच्या जंगलात खाज्या नाईकाला कित्येक वर्षे ब्रिटिश सैन्याला न सापडता जिवंत राहता आले असते, लढतही राहता आले असते पण असे एकाकी लढत राहण्याने ब्रिटिश सत्ता जाणार नव्हती हे त्याला माहिती होते. आपल्यावर विश्वास ठेवून लढ्यात उतरलेल्या असंख्य आदिवासी बंधू-भगिनींचे जीवन उध्वस्त होणार हे त्याला दिसत होते. तरीपण स्व:ता शरण जाण्यास त्याने नकार दिला. त्याने सांगितले.., ब्रिटिश सरकार पूर्णपणे माफी द्यायला तयार असेल तरच लढाथाबायला तयार आहे. यापुढे त्यांचे काय झाले हे कळू शकले नाही. इतिहासात खाज्या नाईकाची नोंद ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक करून ठेवली आहे. यावरून लढवय्या खाज्या नाईकाचे महत्त्व लक्षात येते,

Post a Comment
Post a Comment