-->

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना

 

महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग

मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना

• महाराष्ट्राच्या दुर्गम भागामध्ये स्थित असणाऱ्या आश्रमशाळांमध्ये राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत शिक्षण, आरोग्य तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणा-या इतर सुविधा पुरविल्या जातात. सुदृढ अरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार. मुबलक व पोषक आहार आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा ज्या भौगोलिक परिस्थिती मध्ये स्थित आहेत ते पाहता त्याठिकाणी नियमित ताजा भाजीपाला, फळे व धान्ये पुरविणे जिकरीचे ठरते.  गावांमधील आठवडी बाजार, 'भाजीपाला व फळे साठवून ठेवण्याच्या मर्यादा इत्यादी बार्बीशी सामना करून विद्याथ्यांना दर्जेदार वैविध्यपूर्ण व पोषक आहार पुरविणे याकरीता मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची स्थापना करण्यात आली.


• महाराष्ट्रामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, डहाणू, नाशिक व नंदुरबार येथे स्थित मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या माध्यमातून सदर प्रकल्पातील एकूण ५२४ शासकीय आश्रम शाळांमधील ५६८९३ विद्यार्थ्यांना दिवसातून चार वेळा सकस, मुबलक व पोषक आहार पुरविला जातो. मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आहार पुरवित असताना वैविध्यता राखण्याबरोबरच आहारातील पोषक घटक वाढविण्याकरीता विशेष प्रयत्न करण्यात येतात.

• सन २०२०-२१ मध्ये कोविड १९ या जागतिक महामारी मध्ये देखील प्रकल्प कार्यरत होता. या काळात जव्हार व नंदुरबार येथील मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या माध्यमातून आसपासच्या ४४० अंगणवाडी मधील ३२०० गरोदर व स्तनदा माता तसेच २१,८०० बालकांना अंडी व केळी पुरविण्यात आली तसेच त्या भागातील कोविड विलगीकरण कक्षांकरीता २६.२३० स्थलांतरीत मजुरांना जेवण पुरविण्यात आले. टाळेबंदीच्या काळात अविरत मेहनत घेऊन प्राप्त विविध निधीच्या माध्यमातून मध्यवर्ती स्वयंपाकगृह येथे बनविलेल्या अन्नाचे वाटप गरजूंना करण्यात आले. आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आवडीचा व पोषक आहार पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासाच्या २९ बदलत्या प्रारुपास अनुसरून आधुनिकतेकडे विभागाने टाकलेले हे एक महत्वपूर्ण पाऊत आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुष उपाययोजना तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter