-->

शेळी पालन योजना 2021 महाराष्ट्र | अनुदान? (ऑनलाइन अर्ज)

 


नमस्कार मित्रांनो, आज आपण शेळी पालन योजना 2021 महाराष्ट्र शासन

मध्ये  ऑनलाइन अर्ज कसा करायचा?| महाराष्ट्रातील शेली पालन अनुदान योजना तसेच पंचायत समिती शेळी पालन योजना काय आहे? ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र कसा करायचा?ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा? शेळी पालन अनुदान योजना महाराष्ट्र आणि मराठी मध्ये शेळी पालन बँक कर्ज कसे मिळते या सर्व विषयी चर्चा होणार आहे तरी पुढे दिलेली सर्व माहिती नक्की वाचा आणि आपल्या शेतकरी बांधवाना share करा.

 ‘Maharashtra Sheli Palan Yojana 2021’ राज्य शासनाने सुरू केली आहे, या योजनेच्या माध्यमातून बकरी योजने साठी शेतकर्यांना लागणारे कर्ज दिले जाईल म्हणजेच आर्थिक मदत अनुदान दिली जाईल, जे कर्ज (LOAN) सरकार देईल त्याला जेवढे व्याज लागेल ते सरकार परतफेड करेल.

व्याज शेतकऱ्यांकडून घेतले जाणार नाही. काही ठिकाणी पाणी नसल्यामुळे शेतीचा फारसा फायदा होत नाही मग जर आपण पशुपालन च विचार करत असाल तर आपण त्यामध्ये शेळी पालन करू शकता. यामध्ये डेअरी पेक्षा जास्त नफा होतो.

बकरी पालन-पोषण करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्थानिक बाजारपेठ यासाठी उपलब्ध आहे. ज्यामुळे शेतमालाला बाजाराचा त्रास होत नाही.

स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने सरकार शेतकर्यांना महाराष्ट्र शेळी पालन योजना 2021? साठी प्रोत्साहन देत आहे. आता महाराष्ट्र सरकारने बकरी पालन करण्यासाठी 5 ते 6 लाख रुपयांचे अनुदान देखील जाहीर केले आहे. यासाठी त्वरित online अर्ज करण्याची मागणी करण्यात आली आहे. किसान समाधान यांनी या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.

(शेळी) बकरी पालन योजना 2021 महाराष्ट्र  |  अनुदान आणि लोन Online Form?

माझ्या प्रिय मित्रांनो, हा लेख काळजीपूर्वक वाचा. आम्ही या लेखामध्ये बकरी पालन योजना कर्जाची माहिती तपशीलवार माहिती देऊ. तुम्ही घरी बसून बकरी पालन ऑनलाइन फॉर्म भरून आपण या योजनेचा कसा फायदा घेऊ शकता हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत तसेच या योजनेला कोण कोण पात्र असेल?

काय कागदपत्रे लागतील? हे सर्व महिती सांगू त्यासाठी खाली वाचा. या योजनेसाठी, महाराष्ट्र सरकारने काही नियम व अटी घातल्या आहेत, ज्याचा सर्व लाभार्थ्यांनी पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा केलेला अर्ज रद्द केला जाईल. अर्ज करण्याचे नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत.

महारष्ट्र मध्ये शेळी पालन करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे

दिलेल्या योजनेसाठी खालील पात्रता आवश्यक आहे:-

योजनेस पात्र होण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

मध्यम वर्गीय शेतकरी देखील या योजनेस पात्र होऊ शकतात.

ज्या शेतकर्‍याकडे शेतीसाठी जमीन नाही, तेदेखील या योजनेस पात्र होऊ शकतात.

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

१. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
२. दारिद्रयरेषेखाली असल्याचा दाखला
३. ७/१२ व ८-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ८
४. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
५. जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
६. बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
७. रोजगार-स्नटांरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डची सत्याप्रत.
८. अपत्य दाखला (ग्राम पंचायत यांचा)
प्रमाणपत्र :

लाभार्थी कडे मॉडेल प्रोजेक्ट रिपोर्ट असावा. म्हणजेच कोटेशन असावे ज्यामध्ये बकरीची खरेदी किंमत बकरीची विक्री करताना मिळणारी किंमत आणि लाभांश दर्शवावा गेलेला असावा.

जमीन:  100 शेळ्या व 5 बकरी साठी – 9,000 चौ.मी.लाभार्थ्यांना जमिनीसाठी स्वत: ची व्यवस्था करावी लागेल शेळी / बकरीच्या शेडसाठी आणि चारा वाढविण्यासाठी.

रक्कम: – लाभार्थ्यास 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. जर शेतकऱ्याला कर्ज घ्यायचे असेल तर त्याला कर्ज घेण्यासाठी 1 लाख रुपये द्यावे. तेथे चेक / पासबुक / एफडी / किंवा इतर कोणत्याही पुरावे असावेत.

प्रशिक्षण:  लाभार्थीस शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे. यासाठी लाभार्थीने अर्जाच्या वेळी शेळीपालन संगतीत साक्षांकित प्रमाणपत्र द्यावे.

जातीचा दाखला: – जर उमेदवार अनुसूचित जाती व जमातीचा असेल तर अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

इतर कागदपत्रे: – अर्जाच्या वेळी लाभार्थ्यास फोटो / आधार / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / राहण्याचा पुरावा.


योजनेच्या अटी आणि शर्ती

सदर योजने अंतर्गत प्राप्त होणा-या शेळया योग्य त-हेने पालनपोषण करुन माझ्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग करेन.

१. योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या गटातील शेळया पशुसंवर्धन विभागातील अधिका-यांना पाठपुरावा/ योजना मूल्यांकनासाठी आवश्यक त्या बोळेस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.

२. योजनेअंतर्गत प्राप्त झालेले शेळ्या आजारी पडल्यास अथवा पशुवैद्यकाची गरज पडल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात घेऊन जाईन व त्यांच्या सल्यानुसार उपचार करुन घेईन.

३. योजनेअंतर्गत प्राप्त झालेले शेळी गट ३ वर्षे योग्य रितीने सांभाळणे व त्यापासून व्यवसाय करणे माझेवर बंधनकारक आहे. या दरम्यान विमा काढलेल्या जनावरांचा विम्याचा बिल्ला कानातून पडल्यास त्याबाबात त्वरीत बँक/ विमा कंपनी/ पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांना कळविणे माझेवर बंधानकारक आहे, याची मला जाणीव आहे.

४. योजनेअंतर्गत प्राप्त झालेली शेळी मृत पावल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यास सूचित करुन मृत जनावराचे शवविच्छेदन करुन घेईन व मिळणा-या विमा रकमेतून नविन शेळी खरेदी करणे माझेवर बंधनकारक राहील.

५. योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या शेळयांना साथीच्या रोगापासून संरक्षण मिळण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करुन घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील.

६. योजनेअंतर्गत प्राप्त झालेले शेळयांना काही कारणाने (असाध्या आरोग्य तक्रार) नाईलाजास्तव विकणे गरजेचे असल्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी यांचे परवानगी शिवाय विकणार नाही,

७. आम्ही पती/पत्नीपैकी कोणीही शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्त नाही.

८. मला या अथवा तत्सम शेळी गट योजनेचा लाभ मिळालेला नाही.

९. या योजनेमध्ये मला देण्यात आलेल्या शेळी गटास वनक्षेत्रात चराईसाठी सोडणार नाही आणि बन व पर्यावरणाचा -हास होणार नाही याची मी काळजी घेईन.

या योजनेबाबत मी अर्जात दिलेली माहिती खरी असून योजनेसंबंधीच्या सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत.

योजनेतील जनावरे परस्पर विक्री केल्यास किंवा प्राप्त झालेल्या अनुदानाचा मी गैर उपयोग केल्याचे आढळून आल्यास माझेवर इंडियन पिनल कोड कलम ४१५ ते ४६४ पैकी लागू होणा-या कलमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची मला पूर्ण जाणीव आहे. साक्षीदाराची स्वाक्षरी, नाव .

 

महाराष्ट्र शेळी पालन योजनेंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

यासाठी आपण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरू शकता.

अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.

 

🔴अर्ज/फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा - Download

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter