-->

श्री राम नवमी बद्दल माहिती

तिथी : चैत्र शुद्ध नवमी

इतिहास : श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला.

महत्त्व : देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. श्रीराम नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।' हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

उत्सव साजरा करण्याची पद्धत : `कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. - संकलक) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.' त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्‍ती होते, असे सांगितले आहे.

        हिंदु बंधुबांधव हा दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करतात. चैत्र नवरात्रात नऊ दिवस ठिकठिकाणी रामायणाचे पारायण, भजन, किर्तन, प्रवचानाचे आयोजन करण्यात येतं.

प्रभु रामचंद्राच्या जिवनावर, कार्यावर प्रकाश टाकला जातो. नवरात्राच्या नवव्या दिवशी रामचंद्राच्या जन्माचे किर्तन होते आणि घडयाळाच्या काटयावर ठिक बारा वाजता रामाचा जन्म केला जातो.

फटाके फोडुन, रोषणाई करून आनंद साजरा केल्या जातो. रामाच्या मुर्तिला हार आणि गाठी घातल्या जातात.

आरती आणि प्रसाद वितरण केल्या जाते. प्रसाद म्हणुन सुंठवडा वितरीत केला जातो. प्रभु रामचंद्राच्या मुर्तीला पाळण्यात ठेउन आवर्जुन पाळणा म्हंटल्या जातो. अनेक ठिकाणी झाॅंकी देखील प्रदर्शनात ठेवल्या जातात. रामचंद्राचे संपुर्ण कुटुंब या झाॅंकीत दाखविले जाते.

रामनवमीच्या दिवशी भाविक शक्यतो उपवास करतात. पुर्ण दिवस भजन स्मरण, स्तोत्रपाठ, हवन करून उत्सव साजरा करण्यात येतो.’श्री राम जयराम जयजयराम’ या मंत्राचा नित्य जाप केला जातो. प्रभु रामचंद्रात असलेले गुण अंगिकारण्याचा आपण संकल्प करावा.

प्रभु श्रीराम एकवचनी, एकबाणी, एकपत्नी, गुणवान पुत्र, राजधर्मचारी, होते आणि हे सगळे गुण त्यांच्या अंगी असुन देखील या सर्व गोष्टींच्या त्यांना क्वचित देखील अहंकार नव्हता. संस्कृतिरक्षक श्रीराम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. त्याच्यातील गुण आपल्याला कसे अंगिकारता येतील या साठी श्रीरामाची शिकवण जाणली पाहिजे.

महर्षी वाल्मिकी म्हणतात ‘सदगुणांचा सर्वोच्च बिंदु म्हणजे प्रभु श्रीराम’. राज्याभिषेकाची बातमी कानावर पडली त्याक्षणी तो अत्यानंदीत झाला नाही आणि पुढच्या काही क्षणांत अयोध्या सोडुन चैदा वर्षे वनवासाची बातमी कानावर पडल्यावर तो शोकमग्न देखील झाला नाही… वडिलांची आज्ञा प्रमाण मानुन वनवासाला निघतांना तो किंचीत देखील डगमगला नाही.

एवढया मोठा बलाढय राजा रावण महान शिवभक्त असुन देखील प्रभु श्रीरामचंद्राला अखेरीस शरण आला तो केवळ रामाच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच. यावरून सामान्य मनुष्याला ही शिकवण मिळते की उत्तम गुणांसमोर रथीमहारथी देखील अखेरीस शरण येतात…

प्रभु रामचंद्रांना तीन भाऊ होते परंतु त्यांच्यात कधीही वाद झाले नाहीत. हे सर्व बंधु आपल्या सुखापेक्षा इतर भावाच्या सुखाचा विचार अगोदर करत असत. माता कैकयी मुळे वनवास लाभला तरी देखील त्या मातेचा प्रभु रामचंद्रांनी कधीही तिरस्कार, व्देष केल्याचे ऐकायला नाही येत. इतर मातांप्रमाणेच कैकयी देखील त्यांना कायम वंदनियच होती. प्रभु रामचंद्राची मातृपितृ भक्ती देखील आजच्या तरूणांकरता अनुकरणीय अशीच आहे.

प्रत्येक मनुष्याने आलेल्या प्रसंगाचा धिरोदात्तपणे सामना करण्याची शिकवण आपल्याला प्रभु श्री रामचंद्राच्या जीवनाकडे पाहुन मिळते.


                                                                            ***

रामनवमी का साजरी करतात?

    चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात.रामज्न्म झाल्यावर फटाके फोडतात.त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात.

भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.

रामनवमी व्रत कसे करावे?

* व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.

* दुसर्‍या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.

* त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.

* 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||' या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.

* त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये' हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.

* मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.

* घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.

* कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.

* त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.

रामनवमीच्या दिवशी काय करावे?

* या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.

* दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.

* तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे.

* या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा.

* प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.

* दुसर्‍या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.

* गरीब आणि ब्राम्हणांना दान करून त्यांना जेवू घालावे.

रामनवमी व्रताचे फळ

* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्‍यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.

* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.

* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.
    राम नावात अपार शक्ती आहे. त्याचे नाव लिहिले दगड पाण्यात न बुडता तरंगत होते. त्यांच्या द्वारे सोडण्यात आलेला अमोघ बाण रामबाण अचूक ठरला तर त्यांच्या मंत्राच्या शक्तीबद्दल काय म्हणावे?

चैत्र नवरात्री आणि श्रीराम नवमीला रामचरित मानस, वाल्मीकि रामायण, सुंदरकांड इतर अनुष्ठान करण्याची परंपरा आहे. मंत्रांचे जप देखील केलं जातं. काही सोपे मंत्र असे आहेत ज्यांचा जप केल्याने सर्व संकटांपासून वाचता येऊ शकतं. या मंत्रांचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.


(1) 'राम' हे मंत्र स्वत:मध्ये पूर्ण आहे आणि शुचि-अशुचि अवस्थेत जपता येतो. याला तारक मंत्र म्हणतात.

(2) 'रां रामाय नम:' हा मंत्र राज्य, लक्ष्मी पुत्र, आरोग्य व वि‍पत्ति नाश यासाठी प्रसिद्ध आहे.


(3) 'ॐ रामचंद्राय नम:' क्लेश दूर करण्यासाठी प्रभावी मंत्र आहे.


(4) 'ॐ रामभद्राय नम:' कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी आहे.


(5) 'ॐ जानकी वल्लभाय स्वाहा' प्रभु कृपा प्राप्त करणे व मनोकामना पूर्ती हेतू जपण्यायोग्य आहे.


(6) 'ॐ नमो भगवते रामचंद्राय' विपत्ती-आपत्ती निवारण हेतू जप केला जातो.


(7) 'श्रीराम जय राम, जय-जय राम' या मंत्राचं तोड नाही. शुचि-अशुचि अवस्थेत जपण्यात योग्य आहे.


(8) श्रीराम गायत्री मंत्र 'ॐ दशरथाय नम: विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।' हा मंत्र सर्व संकटांचा नाश करणारा आणि ऋद्धी-सिद्धी प्रदान करणारा मंत्र आहे.


(9) 'ॐ नम: शिवाय', 'ॐ हं हनुमते श्री रामचंद्राय नम:।' हा मंत्र अनेक कामासाठी जपतात. स्त्रिया देखील याचा जप करु शकतात.

सामान्यत: हनुमानजींचे मंत्र उग्र असतात. परंतू शिव आणि राम यांच्या मंत्रांनी जप केल्यास त्यांची उग्रता नाहीशी होते.


(10) 'ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:' शत्रू शमन, न्यायालय, खटला इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी मार्ग प्रशस्त करतात.


रामरक्षास्तोत्र, सुंदरकांड, हनुमान चालीसा, बजरंग बाण इतर जप करुन अनुष्ठान रूपात लाभ प्राप्त करता येतो.


लाल रंगाच्या वस्त्रावर श्री हनुमानजी व भगवान राम यांचे चि‍त्र किंवा मूर्ती समोर ठेवून पंचोपचार पूजन करुन जप करावे. ही सोपी आणि लौकिक विधी आहे.रामरक्षेची उत्पत्ती
    
        रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? "तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे.
ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले.
        शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली.
ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले.
        त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली.
काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा 'रामरक्षेची ' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे ___
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः || तथा लिखितवान्प्रात:प्रबुध्हो बुधकौशिकः ||
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ----------शतकोटीचे बीज म्हणजे राम हि ती दोन अक्षरे.
‘श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?
परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे.
        बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.
हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.
रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.
रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे.
राम राम!
आपण कधी विचार केला आहे का , की आपण "राम-राम" दोन वेळेस का म्हणतो.कारण~~~~~|-
र = २७ वा शब्द. ( क ख ग घ ड..........)
आ = २ रा शब्द. (अ आ..)
म = २५ वा शब्द शब्द.(अ आ............)
एकूण = ५४.
राम + राम.
५४+५४ = १०८.
आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात.
ह्याचा अर्थ = आपण एका व्यक्तीला जर दोनदा "राम-राम" म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो.....तर मग म्हणा की मंडळी ....
राम राम ....

रामनाम घेत असतांना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= *लक्ष्मण* होते
नामस्मरण करताकरता मन उन्मन होते म्हणजेच *हनुमान* होते.
हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की *भरत* होते.
असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात ,शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते *शत्रुघ्न* होते.
अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच *सीता* होते.
सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते *राम* स्वरूप होते.
रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना....
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।
रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।
या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे(सप्तमी),भो राम(संबोधन).
ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.
: रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच!!!

        एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?

रामनामकवच:
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥८॥
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥

असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती नीट पहा....
पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥
म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत!!
आता, थोडं थांबा....'छद्मचारिणः' हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना 'pseudopodium' हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे pseudopodium म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात!! थोडक्यात; इथे 'राक्षस' हे अलिफ-लैला सारखे शिंगं वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत.
आजवर आयुर्वेदिक डाॅक्टरांना वैद्यकीय उपचार करत असताना; अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला आहे. यामागील कारण शोधता-शोधता ही गोष्ट हाती लागली. आजच्या मुहूर्तावरच ती लिहावीशी वाटली ही त्या रामचंद्राचीच कृपा. आपलेही असे काही अनुभव असतील तर जरूर सांगा.
रामरक्षा सिद्ध कशी करावी?

121 रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा
गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज 13 वेळा...किंवा
अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते.
इतर फायदे:
आपदामपहर्तारम.....हा श्लोक 1 लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ आहे.
संपूर्ण रामरक्षेचे 15000 पाठ केल्याने रामरक्षा सिद्ध होते.
प्रत्येक अवयवाचे स्वतन्त्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.

उदा:
कौसल्याये दृशो पातु:.... हा श्लोक सतत म्हटल्याने...
डोळ्यांचे विकार बरे होतात...
जय श्रीराम!!
॥जय श्रीराम॥

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter