-->

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग Anti Corruption Bureau ला तक्रार कशी करावी?


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात Anti Corruption Bureau

सरकारी काम आणी सहा महीने थांब हाच आपल्या सर्व सामान्य नागरीकांचा समाज झाला आहे. ज्या नागरीका चे काम असते ते काम काही अधिकारी हे जाणीवपूर्वक करत नाही किंवा सामान्य नागरीकांना मुद्दाम हेलपटे मारायला लावले जातात त्या मागे त्यांचा हेतु हा फक्त आणी फक्त आर्थिक लालच हेच एकमेव उद्देश असतो. हीच लाच घेण्यासाठी भ्रष्ट अधिकारी हे खाजगी पन्टर नेमतात यांच्या मार्फत ही लाच घेतात अशा वेळी आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB - Anti Corruption Bureau यांना तक्रार करायला हवी.

अशा वेळी सामान्य नागरीकाच्या मनात एकाच प्रश्न येतो तो म्हणजे अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना धडा कसा शिकवावा? लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB - Anti Corruption Bureau यांना तक्रार कशी करावी या व तुमच्या मनातील अनेक प्रश्नाची उत्तरे आज आपण सविस्तर पने बघणार आहोत.

सापळा रक्कम कोणाकडून पुरवली जाते?

सापळा रक्कम तक्रारदाराकडून पुरविली जाते.

कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याचा तपास ACB - Anti Corruption Bureau कार्यालया मार्फत केला जातो?

शासकीय नोकराने लाचेची मागणी, लाच स्वीकारणे, शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा व पदाचा दुरपयोग करून भ्रष्टाचार.

अपसंपदा प्रकरण म्हणजे काय?

शासकीय नोकराने भ्रष्टाचारा मार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:चे नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधन संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमविणे.

तक्रारदार कोणाविरूद्ध लाचेची मागणी संदर्भात तक्रार देवू शकतो?

लोकसेवक किंवा खाजगी इसम जो लोक सेवकाच्या वतीने लाचेची मागणी करील व स्वीकारेल त्याच्या विरोधात तक्रार देऊ शकतो.

लाचेच्या मागणी संदर्भात तक्रार कोणत्याही लोकसेवका विरुद्ध देता येते का?

ज्या लोक सेवकाकडे तक्रारदारांचे कायदेशीर काम प्रलंबित आहे अशा लोकसेवका विरुद्ध तसेच त्याच्याकडे काम प्रलंबित नसतानाही स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरपयोग करील अशा लोकसेवका विरुद्ध.

सापळा कारवाई म्हणजे काय?

लाचेची मागणी, लाच स्वीकारताना व लाच देताना ACB - Anti Corruption Bureau मार्फत सरकारी नोकरास रंगेहाथ पकडणे.

सापळा रक्कम तक्रारदारास परत मिळते का?

होय. सापळा रक्कम तक्रारदारास लवकरात लवकर परत केली जाते.

लाचेच्या मागणीची तक्रार केव्हा देता येते?

सरकारी नोकराकडून कायदेशीर काम करण्याकरिता तसेच कायदेशीर काम न करण्याकरिता पैशाची/इतर गोष्टींची मागणी होत असेल तेव्हा.

सापळा कारवाईक‍रिता तक्रारदारास ACB - Anti Corruption Bureau कार्यालयात हजर रहावे लागते का?

होय, सापळा कारवाईत तक्रारदाराचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.

ACB - Anti Corruption Bureau कार्यालयाची वेबसाईट कोणती आहे?

www.acbmaharashtra.gov.in,

www.facebook.com/MaharashtraACB

तक्रारदारांची ओळख ACB - Anti Corruption Bureau गुप्त ठेवते का?

होय, लाचेचा सापळा वगळता इतर सर्व गुन्ह्यामध्ये तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाते.

सापळा कारवाईनंतर आरोपी लोकसेवा काकडून तक्रारदारास धमकी प्राप्त होत असल्यास?

ACB - Anti Corruption Bureau मार्फत आरोपी विरुद्ध पुरावे जमा करून आरोपी लोकासेवाकाचा जामीन रद्द होण्याकरिता न्यायालयास विनंती केली जाते.

लाचलुचपत विभागात खाजगी व्यक्ती समाविष्ट होऊ शकतो का?

नाही, भ्रष्ट अधिकाऱ्याची माहिती कोणीही अेसीबी कडे देऊ शकतो.

प्रत्येक जिल्ह्यात ACB - Anti Corruption Bureau कार्यालय उपलब्ध आहेत काय?

होय.

तक्रार कोठे नोंदविता येईल तक्रारदार राहतो त्या ठिकाणी की आरोपी लोकसेवक काम करतो त्या ठिकाणी?

कोठेही, १०६४ क्रमांकाद्वारे.

ACB - Anti Corruption Bureau कोणाच्या देखरेखीखाली कार्य करते?

महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

तक्रार नोंदवण्याकरिता कोणता टोल फ्रि क्रमांक उपलब्ध आहे का?

होय, १०६४ व १८०० २२२ ०२१

तक्रार कशी नोंदविता येते?

वेबसाईट मार्फत, फेसबुक पेज मार्फत, मोबाईल अॅप्स मार्फत, टोल फ्रि क्रमांक १०६४, लेखी अर्ज. तसेच लाचेची तक्रार देण्याकरिता तक्रारदाराने स्वतः ACB - Anti Corruption Bureau कार्यालयात हजार राहणे गरजेचे आहे.

सापळा कारवाईनंतरही फिर्यादीचे काम प्रलंबित राहिल्यास ACB - Anti Corruption Bureau मार्फत कोणती पावले उचलली जातात?

ACB - Anti Corruption Bureau मार्फत संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे कायदेशीर काम पूर्ण होण्याकरिता पाठपुरावा केला जातो.

अपसंपदा प्रकरणामध्ये आरोपी च्या मालमत्तेचे पुढे काय होते?

अपसंपदा प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवल्यानंतर मा. न्यायालयाद्वारे लोकसेवका ची मालमत्ता गोठविली जाते.

गुन्हा दाखल झाल्यावर तक्रारदारास न्यायालयात हजर रहावे लागते का?

न्यायालयीन प्रक्रिये दरम्यान न्यायालयात साक्षीकामी हजर राहणे आवश्यक असते.

अपसंपदा संदर्भात तक्रार कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध देता येते का?

होय. ज्या लोक सेवकाने भ्रष्टाचारा मार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:चे नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधन संपत्तीच्या किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांच्या विसंगत प्रमाणात मालमत्ता जमविलेली आहे अशा लोकसेवका विरुद्ध. ज्या लोकसेवकाने भ्रष्टाचार करून मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमा केली आहे अशा लोकसेवाका विरुद्ध.

ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे का?

होय, www.acbmaharashtra.gov.in वरील तक्रार या सदराखाली व www.facebook.com/MaharashtraACB या फेसबुक पेज वर lodge a complaint या सदराखाली.

लोकसवकाने घटनास्थळीच लाचेची मागणी केली किंवा लाच स्विकारली तर ऐसीबी काय कारवाई करील ?(उदा. रेल्वे टीसी., ट्राफीक पुलिस, महानगरपालिकाचे नाका कर्मचारी, कोर्ट कर्मचारी यांचेकडून शपथपत्र दाखल करण्यासाठी, ई.)

अशा लाचेच्या घटनांची माहितीबाबत मोबाईल/केमेरामध्ये ऑडिओ/व्हिडिओ टीपूण घेऊन ती एसीबीचे www.acbmaharashtra.net या मोबाइल अॅप वरील तक्रार पॅनल मधून पोस्ट करावी.

लोकसेवकाने वरील नमुद केलेल्या घटनांवर आळा बसण्यासाठी व त्यास प्रतिबंध करण्यासाठी ऐसीबी काय पावले उचलत आहे. तसेच त्याकारीता ऐसीबीला जनतेकडून कोणत्या सहकार्याची अपेक्षा आहे?

होय. लाचेच्या घटनांची माहितीबाबत मोबाईल/केमेरामध्ये ऑडिओ/व्हिडिओ टीपूण घेऊन ती एसीबीचे www.acbmaharashtra.net या मोबाइल अॅप वरील तक्रार पॅनल मधून पोस्ट करावी.

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter